वस्तू मिळण्याचे धोरण
शेवटचे अद्यतन: १ ऑगस्ट २०२६
हे धोरण MandalBook वापरणाऱ्या सर्व मंडळांना लागू आहे.
1. खरेदीनंतर काय होते
- पेमेंट यशस्वी झाल्यावर लगेच तुमच्या स्क्रीनवर पिकअप पास (QR कोड) दिसतो.
- तोच पास तुमच्या WhatsApp वर पावतीसह पाठवला जातो.
- पास फोनमध्ये सेव्ह करून ठेवा — वस्तू घेताना तोच दाखवायचा आहे.
2. वस्तू कुठे व कधी मिळेल
- ठिकाण: ज्या मंडळाकडून तुम्ही खरेदी केली, त्यांचा मंडप किंवा त्यांनी सांगितलेले ठिकाण.
- वेळ: मंडळाने जाहीर केलेल्या वेळेनुसार. सामान्यतः सणाच्या दिवसांत मंडप सुरू असताना.
- नेमके ठिकाण व वेळ मंडळ तुम्हाला WhatsApp वर किंवा त्यांच्या गटात कळवते.
3. वस्तू घेताना
- मंडळाच्या स्वयंसेवकाला तुमचा पिकअप पास QR दाखवा.
- ते तो स्कॅन करतात — पेमेंट झाल्याची खात्री लगेच स्क्रीनवर दिसते.
- वस्तू तुमच्या ताब्यात दिली जाते.
प्रत्येक पास एकदाच वापरता येतो. वस्तू दिल्यानंतर तो आपोआप बंद होतो, त्यामुळे कोणीही तोच पास पुन्हा वापरू शकत नाही.
4. पास हरवला तर
काळजी नको. पास ही फक्त तुमच्या ऑर्डरची खूण आहे — खरी नोंद मंडळाच्या अॅपमध्ये सुरक्षित असते. WhatsApp वरील पावती पुन्हा पहा, किंवा तुमचा ऑर्डर क्रमांक घेऊन मंडळाशी संपर्क साधा; ते तुमची ऑर्डर शोधून वस्तू देऊ शकतात.
5. वेळेत वस्तू न घेतल्यास
सणाचा कालावधी संपण्यापूर्वी वस्तू घेणे आवश्यक आहे. काही अडचण असल्यास मंडळाशी आधी संपर्क साधा — ते पर्यायी व्यवस्था करू शकतात. वस्तू न घेता आल्यास रद्द व परतावा धोरण लागू होते.
6. संपर्क
📞 +91 96640 05652 · ✉️ siddheshkhot008@gmail.com
Summary in English
There is no shipping or courier delivery. Every item bought through a MandalBook shop link is collected in person at the mandal (community organisation) you purchased from. No delivery charges apply.
- Immediately after payment the buyer receives a pickup pass (QR code) on screen, and the same pass plus a receipt on WhatsApp.
- Collection point: the mandal's own pandal or the location it announces. Timing: during the mandal's published hours, normally within the festival period.
- At collection the buyer shows the QR, a volunteer scans it, payment is verified live on screen, and the item is handed over.
- Each pass is single-use and is closed automatically once the item is handed over, so it cannot be reused.
- Lost pass: the record lives in the mandal's app, not the image — the buyer can re-open the WhatsApp receipt or quote their order code to the mandal.
- If an item cannot be collected within the festival period, the Cancellation & Refund Policy applies.